ऑफिस सुटल्यानंतर नेहमीचीच भागदौड करत भायखळा
स्टेशन वर पोहचलो. traffic च्या कृपेने आजही उशीराच पोहचलो आणि नेहमीची लोकल
चुकली. Platform पूर्ण रिकामा होता. नुकतीच ट्रेन गेली होती. मी platform वरील एका
बाकड्यावर विसावलो होतो. ७ मिनिटांत पुढील ट्रेन अपेक्षित असताना १५ मिनिटे होवून
गेले तरी ट्रेन चा पत्ता नव्हता. रिकामा वाटणारा platform एव्हाना गर्दीने फुलला
होता.
Indicator बदलापूर आणि ठाणे लोकल सोबत लपाछपी खेळत
होता. २० मिनिटांनंतर बदलापूर लोकलचे आगमन झाले. बदलापूर लोकल असल्याने मी मागची
लोकल पकडण्याचे ठरवले. माल डबा येतो त्या ठिकाणी एक भैया एक मोठे गाठोडे ठेवून बाजूलाच
उभा होता. गर्दी आता platform च्या काठावर एकवटली होती आणि सर्वजण ट्रेन
पकडण्यासाठी सज्ज झाले होते.
platform वर ट्रेन थांबताच प्रवाशांनी गाडी
पकडण्यासाठी धाव घेतली. या गडबडीत एक सद्गृहस्थ गाठोड्याला अडखळून पडला. त्याच्या मागेच
धावणारा अजून एक प्रवाशी अडखळून पहिल्या प्रवाशाच्या अंगावर पडला. आता तिथे एकच
गोंधळ उडाला. एकमेकांत अडकून असे बरेच अडखळले, काही सावरले.. काही पडले. काहींनी गाठोड्याच्या
मालकाच्या आईची आठवण काढली आणि मालकाला शोधू लागले. भैय्या बिचारा असा उभा होता की
ते गाठोडे त्याचे नाहीच..
No comments:
Post a Comment