Thursday, 9 February 2017

शिक्षण आणि परिस्थिती



काल रात्री भांडुप स्टेशनहून घरी येत होतो. रस्त्याच्या कड़ेला एक १० रु. ची नोट पडलेली दिसली. एका विजेच्या खांबाखाली दिव्याच्या उजेडात झोपड पट्टीतील एक पोरगा अभ्यास करत होता. त्याने मला नोट उचलताना पाहिलं असावं कदाचित. बाजुलाच त्याची आई दगडाच्या चुलीवर भाकरी थापत होती. विनासायास मिळालेले १० रु त्याला द्यावेसे वाटले. १० रुपयांची नोट त्याला द्यायला मी हात पुढे केला.. बोल्लो, घे बाळा.. तुला बक्षिस. काय राव प्रामाणिक आणि स्वाभिमानी पोरगं ते.. "नको मला.." म्हणून स्पष्ट शब्दात नकार दिला, बोलला "माझे नाहियेत हे.." दुसऱ्यांदा आग्रह करूनही तो आपल्या नकारावर ठाम राहिला. मला तर कळेनासे झाले. काय हा प्रामाणिकपणा. तितक्यात त्याची आई त्याच्यावर खेकसली. "ए, गाबड्या.. तुयेच पडले व्हते ना ते. काय कळातं का तुला.. ? द्या वो सायेब, त्याचेच हाय ते..

आईने दम टाकल्यावर अनिच्छेने त्याने हात पूढे केला. शिक्षण माणसाला घडवतं पण परिस्थिती जगायला शिकवते. मुलगा घडत होता आणि आई जगत होती. जावुद्या, माझा पण हेतु साध्य झाला म्हणून मी पण खुश होतो.😊😊

No comments:

Post a Comment